युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:मोटरसायकल व कारचा भिषण अपघात:विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या दोघांवर काळाचा घाला

 मोटरसायकल व कारचा भिषण अपघात:विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या दोघांवर काळाचा घाला



परळी वैजनाथ, प्रतिनिधी
          परळी पासून जवळच असलेल्या धर्मापुरी रस्त्यावरील नंदनज गावाजवळील रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास  कार व मोटरसायकलचा अपघात घडला. या अपघातात नंदनज येथील दोघेजण ठार झाले आहेत.
         याबाबत प्राप्त माहितीनुसार, कार क्रमांक एम एच बारा सी आर 21 60 या क्रमांकाच्या कारने मोटरसायकलला  धडक दिली. या भीषण अपघातात नंदनज येथील ज्ञानोबा नाथराव गुट्टे वय 45 व केशव गुट्टे यांचा मृत्यू झाला आहे. परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहेत. एका विवाह सोहळ्यासाठी जात असतानाच या दोघांवर काळाने घाला घातला आहे .या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या