प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 परळीत आज हास्यजत्रा फेम समीर चौगुले व चेतना भट 


परळीत सुरू होतंय खेळातून आनंददायी शिक्षण  युनिक क्युरियस किड्स स्कूल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी

          पूर्व प्राथमिक स्तरावरील शिशुवर्गीय मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव देता यावा व त्यातून त्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा प्राप्त व्हावी यासाठी युनिक क्युरीयस किड्स या आनंददायी शिक्षण देणाऱ्या सुसज्ज शाळेचा आज दि.21 रोजी दुपारी 4 वा. शुभारंभ होत आहे. या निमित्ताने हास्य जत्रा फेम कलाकार समीर चौगुले व चेतना भट यांची विशेष उपस्थिती व सादरीकरण होणार आहे.


         लहान मुलांना खेळण्याच्या बागडण्याच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणातून घडविण्यासाठी क्युरियस किड्स ही शाळा प्रसिद्ध आहे. या शाळेची शाखा आता आपल्या परळी शहरात सुरू होत असून युनिक क्युरियस किड्स या आनंददायी शिक्षण केंद्राचा शुभारंभ मान्यवरांचे उपस्थित आज दिनांक 21 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध हास्य कलाकार समीर चौगुले व चेतना भट यांची उपस्थिती व सादरीकरण होणार आहे. युनिक क्युरियस किड्स या शाळेचे उद्घाटन क्युरियस किड्स  स्कूलचे संस्थापक संजय रोडगे, महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन रतन कोठारी, स्त्री रोग तज्ञ डॉ. शालिनी कराड, पांगरी चे सरपंच सुशील कराड, मुख्य प्रशासक राकेश चांडक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास पालकांनी व परळीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युनिक क्युरिअस किड्स च्या संचालिका सौ. पूजा सचिन सारडा व अबॅकस ब्रेन्सच्या संचालिका सौ शितल पवन पंपालिया यांनी केले आहे.

••

परळी शहराला आवश्यक असलेली अत्याधुनिक प्री स्कुल ...UNIK CURIOUS KIDS

नावा प्रमाणेच Unik शिक्षण व आपल्या चिमुकल्यांना प्रफुल्लित वातावरणात शिक्षण देण्यास आम्ही आता सज्ज आहोत .

शाळेची वैशिष्ट्ये.....

*जगविख्यात FINLAND BASED EYFS CONCEPT

* INNOVATIVE EDUCATION

* PENTA CORNERS

* नवीन शिक्षण प्रणाली वर आधारीत 

* Experimental learning environment.

* 21व्या शतकातील कौशल्यांचा पुरेपूर उपयोग

* व्यक्तिगत,सामाजिक व भावनात्मक विकास

* 100 विद्यार्थीच्या आसन  व्यवस्था असलेली Auditorium 

*All CCTV surveillance

आणि बरेच काही....

तर लवकरात लवकर शाळेला भेट द्या...आम्ही आपल्या चिमुकल्यांना भेटण्यास उत्सुक आहोत...


UNIK CURIOUS KIDS

45, INDUSTRIAL ESTATE ,

PARLI VAIJNATH 

📞9607070809



••••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या