धनंजय मुंडेंच्या सूचनेनुसार सोडण्यात येणार पाणी*

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी :पाऊस लांबल्याने माजलगाव उजव्या कालव्यातून सोमवारी  सोडण्यात येणार पाणी




*पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची अडचण लक्षात घेत धनंजय मुंडेंनी केली सूचना*


*शेतकऱ्यांना मिळणार दिलासा*


परळी वैद्यनाथ (दि. 23) - जून महिन्याचा अखेरचा आठवडा आला तरीही पावसाने हुलकावणी दिल्याने परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या व सिंचनाच्या संभाव्य अडचणी लक्षात घेत आ.धनंजय मुंडे यांनी पाटबंधारे विभागास माजलगाव उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या आहेत. 


पाटबंधारे विभागाने सोमवारी माजलगाव उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


माजलगाव उजव्या कालव्यातून साधारणपणे 7 जूनला पाणी सोडणे बंद करण्यात येते. मात्र परळी तालुक्यातील लाभ मिळणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची अडचण लक्षात घेत आ.धनंजय मुंडे यांनी पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या होत्या. 


यामुळे या भागातील ऊसाला व नव्याने लावण्यात येत असलेल्या कपाशीला पाण्याचा फटका बसण्यापासून दिलासा मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. सोमवारी माजलगाव उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार असून, या भागातील शेतकऱ्यांनी आ.धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार