इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

 परळी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरा - आश्विन मोगरकर

परळी वैजनाथ

परळी उपजिल्हा रुग्णालयात मागील आठ दिवसापासून सोनोग्राफी तज्ञ व एक्सरे टेक्निशियन नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. ही रिक्त पदे त्वरित भरावेत यासाठी वैद्यकीय अधिक्षकांना  भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी निवेदन दिले आहे.

 परळी वैजनाथ शहर व तालुक्याच्या सर्वसामान्य रुग्णांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. मागील आठ दिवसापासून सोनोग्राफी तज्ञ व एक्सरे टेक्निशियन नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. यामुळे रुग्णांना नाहक भुर्दंड बसत आहे. सर्व सुविधा असतानाही फक्त टेक्निशियन नसल्यामुळे मशीन बंद आहेत. उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणात गरोदर माता येत असतात. त्यांना वेळोवेळी सोनोग्राफी करावी लागत असते. मात्र सोनोग्राफी तज्ञ नसल्याने खाजगी दवाखान्यात जाऊन सोनोग्राफी करावी लागते आहे. परळी शहरात थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, हायवे असल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आशा घटनेत एक्सरे ची आवश्यकता असते. तसेच सर्वसाधारण रुग्णांना गरजेनुसार सोनोग्राफी तज्ञ व एक्सरेची आवश्यकता आहे. उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी तज्ञ व एक्सरे टेक्निशियन नेमावेत या मागणीचे निवेदन बुधवार, 5 जुलै रोजी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ढवळे यांना दिले आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....