किरकोळ भांडणातून सराफा व्यापाऱी तरुणाचा खून



 धारूर.....

किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाचा खून झाल्याची घटना धारूर येथील तेलगाव रोड येथील एका बिअर बार येथे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली . याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे .

धारूर येथील तेलगाव रोड लगत एक बियर बार आहे . या ठिकाणी  धारूर येथील नितीन मोहन धोत्रे वय ४० वर्षे व इतर काही जणांमध्ये रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास भांडण झाले होते . या भांडणांमध्ये नितीन धोत्रे या तरुणाचा डोक्यात मार लागल्याने जागीच खून झाल्याची घटना घडली आहे . भर रस्त्यावर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे धारूर शहरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पहाणी केली . नितीन धोत्रे यांचे धारूर शहरात सराफा दुकान आहे . या प्रकरणांमध्ये नातेवाईकांनी पोलीसात धाव घेवून आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती . पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार