युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस

 नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस: शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम -  सहसचिव प्रदीप खाडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी शहरातील नावाजलेल्या नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त  नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने  दि. 8 ते 15 जुलै शैक्षणिक,  सांस्कृतिक तसेच विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची अशी माहिती नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी दिली.

            महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे म्हणजे परखड नेतृत्व. मंत्रिमंडळात काम करताना नेहमी शैक्षणिक शेतकऱ्यांच्या व विविध विषयाची बाजूने ठामपणे उभे राहून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल या साठी नेहमी त्यांचे प्रयत्न असतात. म्हणूनच ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 8 ते 15  जुलै विविध शैक्षणिक सांस्कृतिक तसेच लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये आतंरशालेय स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वृक्षरोपण व संवर्धन, आरोग्य तपासणी, वादविवाद स्पर्धा, रक्तगट तपासणी, संगित स्पर्धा अशा तालुक्यातील विविध स्पर्धा मिलिंद विद्यालय, शारदा विद्या मंदिर बँक कॉलनी, सौ. शारदाबाई मेनकुदळे विद्यालय संगम रोड याठिकाणी स्पर्धा होणार आहेत.

         ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांमध्ये परळी तालुक्यातील शाळा व विध्यार्थीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आव्हान नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे तसेच संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य प्रा. अतुल दुबे, प्राथमिक विभागाचे समन्वयक आर. जे. ओझा,  मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य /मुख्याध्यापक बी. जी.कदरकर, पर्यवेक्षक एम आर.धायगुडे, शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक ए. व्ही.लोणीकर, सौ. शारदाबाई मेनकुदळे विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एस.साखरे, मिलिंद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. राठोड, शारदा विद्या मंदिर प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीमती एस. एल. धस आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या