इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

परळीमध्ये 26 ऑगस्ट रोजी प्रकाशन

 लढा! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा !! विशेषांकाचे परळीमध्ये 26 ऑगस्ट रोजी प्रकाशन


..................

परळी वैजनाथ दिनांक 25 ऑगस्ट

नव्या पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास कळावा यासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून सांस्कृतिक वार्तापत्राने संपादित केलेल्या " लढा! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा !! " या विशेषांकाचे प्रकाशन परळी येथील भाशिप्र संचलित भेल सेकंडरी स्कूलमध्ये दिनांक 26 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन ख्यातकीर्त सिनेअभिनेते व सुप्रसिद्ध वक्ते श्री राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते होणार आहे.

       या कार्यक्रमाला सांस्कृतिक वार्तापत्र, पुणेच्या सौ. सुनीताताई पेंढारकर व किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जुगलकिशोर लोहिया राहणार आहेत. या प्रकाशन कार्यक्रमानंतर राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान होणार आहे. परळी वैजनाथ येथील टीपीएस कॉलनी मधील शाळेच्या केजी हॉलमध्ये सकाळी साडेअकरा वाजता हे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला परळी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या