इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

शिकवणाऱ्या मौलानाकडून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग,

 अरबी शिकवणाऱ्या मौलानाकडून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल



परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...
             परळी शहरात अरबी भाषेची शिकवणी घेणाऱ्या मौलानाने शिकवणीला येणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन मौलानाविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         परळी शहरातील खुदबे नगर भागात शेख सोहेल गणी रा. जुना रेल्वे स्टेशन हे आरबी भाषा शिकवण्याची शिकवणी घेतात. याच भागातील १३ वर्षीय विद्यार्थीनी मागील आठ दिवसांपासून त्या मौलानाकडे आरबी शिकण्यासाठी येत होती. दि. २२ ऑगस्ट रोजी शिकवणीहून घरी आल्यानंतर सदरील मुलगी रडू लागल्याने तिच्या आईने समजावुन सांगत कारण विचारले असता तीने  मौलाना हा मला समोर बोलावुन विनयभंग करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी या मौलानाविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या