इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

दुखःद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

 डॉ. शाम काळे यांना पितृशोक:तुकाराम काळे यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शाम काळे यांचे वडील तुकाराम सखाराम काळे यांचे आज बुधवार (दि.२३) रोजी रात्री ९ वा. निधन झाले.मृत्युसमयी  ते ८० वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
         तुकाराम सखाराम काळे  हे  काळे परिवारातील जेष्ठ व जुन्या पिढीतील अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित होते. अतिशय मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीचे सुस्वभावी व्यक्तिमत्व होते.वार्धक्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार दि 24/8/23 गुरुवार सकाळी 10 वाजता मूळ गावी,कुंडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने काळे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या