व्हॉईस ऑफ मीडियाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुकेशनी नाईकवाडे यांचा सत्कार

 व्हॉईस ऑफ मीडियाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुकेशनी नाईकवाडे यांचा सत्कार





परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.10 -  देशातील सर्वात आघाडीची पत्रकारांची संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या महाराष्ट्र (महिला) प्रदेशाध्यक्षपदी परळी येथील पत्रकार तथा टाइम्स नाऊच्या बीड जिल्हा प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा परळी तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी वरिष्ठांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली.या निवडीबद्दल परळी तालुका व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार नाईकवाडे यांचा येथील जिजामाता उद्यानात सर्व पदाधिकारी सदस्य तथा मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देत पेढा भरवुन सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल सुकेशनी नाईकवाडे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.


वाढदिवसानिमित्त युवा पत्रकार विकास वाघमारे यांचा सत्कार

 

परळी शहरातील सिने नाट्य कलावंत, उदयोनमुख युवा पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य  विकास वाघमारे यांचा यावेळी वाढदिवसानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया परळी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे परळी तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील, कार्याध्यक्ष महादेव गीते, उपाध्यक्ष श्रीराम लांडगे, मार्गदर्शक सदस्य धनंजय आढाव, प्रा. रवींद्र जोशी, मोहन व्हावळे, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे, संजीब रॉय, महादेव शिंदे, बालाजी ढगे आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !