युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

श्रीमती शांताबाई गोविंदराव आलूरकर यांचे देगलूर येथे निधन

......
नांदेड दिनांक 6 फेब्रुवारी
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा देगलूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सुरेंद्रजी आलुरकर व सेवानिवृत्त वनाधिकारी कृष्णा आलुरकर यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई गोविंदराव आलूरकर (वय 94 वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता देगलूर येथे निधन झाले. वैकुंठधाम स्मशानभूमी,देगलूर येथे दि 6 फेब्रुवारी 24 रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. परोपकारी स्वभावाच्या,अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाच्या, धार्मिक वृत्तीच्या व संपूर्ण आलूरकर परिवाराला मायेने वाढविणाऱ्या आजी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. अंत्यसंस्काराच्या वेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शंकरराव लासुणे( उदगीर ), माणिकराव भोसले ( नांदेड ), वट्टमवार , माजी आमदार सुभाष साबणे , नगराध्यक्ष शंकरराव कंठेवाड, देगलूरच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रेखावार, स्थानिक कार्यवाह प्रकाश चिंतावार, उपाध्यक्ष प्रा. गिरीश वझलकर, शालेय समितीचे अध्यक्ष संजय पाटील, अध्यात्मिक क्षेत्रातील ह.भ. प. राजेश महाराज देगलूरकर, ह. भ. प. शंतनू महाराज देगलूरकर , दिनेश मुनगिरवार, नंदकुमार दाशेटवार, माजी नगराध्यक्ष गंगाधर जोशी, प्रा संतोष कुलकर्णी, मुख्याध्यापक रमेश सातपुते, मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, दमण देगावकर, संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध संस्कार केंद्रामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

......

नांदेड ,प्रतिनिधी...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या