परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

आखाड्यावरून मोटारसायकल घेऊन गेला तो परतलाच नाही

  शेतातील आखाड्यावरून मोटारसायकल घेऊन गेला तो परतलाच नाही



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
   शेतातील आखाड्यावरून कोणालाही न सांगता शेत मालकाची मोटरसायकल घेऊन गेला तो संपला परतलाच नसल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी  सुभाष माधवराव मुंडे वय 60 वर्षे व्यवसाय शेती रा. नाथरा ता. परळी वै. यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्र. MH23 D 1477 ज्याचा चेसिज क्र. 95) 12F01466 इंजीन क्र. 95) 10E0 1790 ही जीचा मोडेल 1995 ची जुनी वापरती किंमत अंदाजे 12000/- ही मोटारसायकल यातील आरोपी राहुल बालाजी कांबळे रा. दिपेवडगाव ता. केज जि. बीड हा कोणालाही काहीएक न सांगता कोठेतरी चोरुन घेऊन गेला आहे तो आजपर्यंत परत आला नाही. त्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह/1429 केकान हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!