संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

मातृदिनानिमित्त परळी तालुका माहेश्वरी युवा संघठनने आयोजित केली राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीग

 मातृदिनानिमित्त परळी तालुका माहेश्वरी युवा संघठनने आयोजित केली राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीग


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
    मातृदिनानिमित्त परली तालुका माहेश्वरी युवा संघठन ने अनोखा उपक्रम हाती घेऊन राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन केले.या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
    एस.जी. क्रिकेट टर्फ, धर्मापूरी कॉर्नर, गंगाखेड रोड, परली वैजनाथ येथे रविवार, १९ मे २०२४ रोजी मातृदिनानिमित्त राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली होती. मातृवर्गाच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीगच ेविशेष आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.या आयोजनाच्या यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन अँड. संज्योत लाहोटी,अध्यक्ष सुरज कोठारी,सचिव सुमित नावंदर, खेळ समन्वयक अमित रांदड व सर्व पदाधिकारी, सदस्य परळी तालुका माहेश्वरी युवा संघठन यांनी परिश्रम घेतले.

 ● यांनी जिंकली पारितोषिके
        दरम्यान अतिशय रोमहर्षक व उत्साहपूर्ण झालेल्या या लीगमध्ये प्रथम पारितोषिक - जय उमा महेश वॉरियर्स ,द्वितीय पारितोषक - रॉयल चॅलेंजर्स परळी या महिला संघाने पटकावले. विजयी संघांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....