सौ.कीर्तीमाला शेटे यांचे निधन: पत्रकार भागवत पोपडे यांना भगिनीशोक

सौ.कीर्तीमाला शेटे यांचे निधन: पत्रकार भागवत पोपडे यांना भगिनीशोक



परळी वै.प्रतिनिधी...

     परळी वै. येथील माणिक नगर येथील रहिवासी असलेल्या सौ. कीर्तीमाला  धोंडीराम शेटे वय 50 वर्षे यांचे रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले. त्या कपिलधार येथे वास्तव्यास होत्या. कपिलधार येथे दर्शनासाठी भाविक गेल्यावर आपुलकीने सर्वाच्या तब्येतीची विचारपूस करणार्‍या, प्रत्येकाला  प्रेमाने वागा' असे सांगणाऱ्या, चेहर्‍यावरून दोन्ही हात फिरवून मायेने जवळ घेणार्‍या प्रेमळ असा असणारया  सौ. किर्तीमाला शेटे यांनी रक्ताच्या नात्यासोबतच त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाला आपल्या सुस्वभावाने आपलंस केलं, अशा सुस्वभावी, बोलक्या, प्रेमळ आणि निर्मळ मनाच्या किर्तीमाला यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने आप्तस्वकिय उपस्थित होते. सतत हसतमुख आणि प्रत्येकाला हसून बोलणाऱ्या होत्या. त्यांच्या पश्चात पती धोंडीराम शेटे, एक मुलगा रवींद्र शेटे चार मुली ज्योती, पूजा, आरती, छकुली, चार भाऊ, दोन बहिणी, तीन जावई, सून ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सोनपेठ येथील दैनिक सामना तालुका प्रतिनिधी भागवत पोपडे यांच्या भगिनी होत. कीर्तीमाला ताई शेटे यांच्या निधनाने शेटे परिवार व पोपडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो. त्यांच्यावर 25 ऑगस्ट सायंकाळी 5.00  वाजता परळी वैजनाथ येथील वीरशैव स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला यावेळी आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !