दुःखद वार्ता : रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना पितृशोक;गंगाधरराव मुंडीक यांचे निधन
दुःखद वार्ता : रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना पितृशोक;गंगाधरराव मुंडीक यांचे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी रमेश मुंडीक धारासुरकर यांचे वडील गंगाधरराव मुंडीक यांचे आज दि. ४ रोजी सकाळी नऊ वाजता निधन झाले. मृत्यू समयी ते 95 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
परळी सोनार समाजाचे सराफ व्यापारी रमेश मुंडीक (धारासुरकर) यांचे वडील गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर ) यांचे आज सकाळी 9:00 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. अतिशय कष्टाळू, सुस्वभावी, धार्मिक वृत्तीचे म्हणून त्यांचा सर्वांना परिचय होता. कुटुंबवत्सल व मुंडीक कुटुंबाचा आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने मुंडीक कुटुंबातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. परळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असुन अंत्ययात्रा सायंकाळी 5:00 वाजता कृष्णा नगर भागातील श्री संत नामदेव महाराज मंदीर पाठीमागे राहते घर येथून निघेल. त्यांच्या निधनाने मुंडीक कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा