परळीत उद्या कॅन्डल मार्च !

परळी (प्रतिनिधी).....

        मस्साजोगचे सरपंच कै संतोष देशमुख, महादेव मुंडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च काढून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परळी शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.  

         परळी वैद्यनाथ येथे बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजता जिजामाता उद्यान येथील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कॅण्डल मार्चला सुरुवात होईल पुढे राणी लक्ष्मी टावर, मोंढा मार्केट, स्टेशन रोड मार्गे , बस स्टॅन्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग असेल त्यानंतर कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचल्यानंतर त्याठिकाणी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येईल.

    या कॅन्डल मार्च व सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी परळी शहरातील व तालुक्यातील सर्व महिला, पुरुष, तरुण लहान थोर मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !