पैठण येथे १० मार्च रोजी गौरव सोहळा

ह.भ.प. पूज्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज यांना 'वारकरी भूषण' पुरस्कार जाहीर




पैठण येथे १० मार्च रोजी गौरव सोहळा; शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज मिशनचा उपक्रम

बीड: प्रतिनिधी 

      शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज मिशन आणि नाथवंशज श्री. योगिराज महाराज पैठणकर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी देण्यात येणारा मानाचा 'वारकरी भूषण पुरस्कार' यावर्षी ह.भ.प. आचार्य पूज्यश्री अमृताश्रम स्वामी महाराज (जोशी बाबा, बीड) यांना जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

     दंडवत स्वामींच्या परंपरेतील वारसा असलेले अमृताश्रम स्वामी महाराज यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नवगणराजुरी येथील एका सात्विक कुटुंबात झाला. ते शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे परमशिष्य परमहंस 'दंडवत स्वामी' यांच्या परंपरेतील वारसदार आहेत. वारकरी संप्रदायातील त्यांचे प्रदीर्घ कार्य आणि आध्यात्मिक योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.

     दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पैठण येथील नाथगल्लीतील श्रीसंत नरहरी सोनार धर्मशाळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ संत-महंत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या महनीय व्यक्तींना दरवर्षी या व्यासपीठावरून सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या या घोषणेमुळे वारकरी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, बीड जिल्ह्यातूनही महाराजांच्या सत्कारासाठी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मराठा महासंघ अध्यात्मिक आघाडीकडून हार्दिक अभिनंदन 

     अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यात्मिक आघाडीचे बब्रुवान शेंडगे पाटील महासंघाचे राज्य प्रवक्ते भागवताचार्य ह भ प श्रीराम महाराज शेळके मराठवाडा विभागीय अध्यक्ष राम मोहिते पाटील वडवणी तालुका अध्यक्ष दिनुभाऊ शेंडगे नारायण शेळके भैय्यासाहेब शेळके ह भ प सुनील महाराज अंडील गोविंदराव मस्के पाटील इत्यादींनी महाराजांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...