पोस्ट्स

ऑगस्ट ३०, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  जेजुरी संस्थानचे विश्वस्त तसेच जेजुरीचे नगराध्यक्ष यांच्यासह परळीत मान्यवरांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ : प्रतिनिधी — श्रावण महिन्याच्या पावन पर्वात धार्मिक स्थळांना भेटी देत असताना मार्तंड देवस्थान, जेजुरीचे विश्वस्त तथा जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप भैय्या बारभाई, नगरसेवक योगेश भैय्या जगताप, जेजुरीचे सामाजिक कार्यकर्ते वैभव कोरपड, सुरेश राऊत व प्रशांत कापसे या मान्यवरांनी परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी परळीकरांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनीही त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र सोनी यांची उपस्थिती होती.जेजुरी आणि परळी या दोन प्रमुख धार्मिक स्थळांमधील भक्तिभावाचे नाते अधिक दृढ करणारा हा प्रसंग ठरला. दर्शनावेळी मान्यवरांनी प्रभू वैद्यनाथाची पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 

पुणे येथील ज्योतिष महासंमेलनामध्ये पुरस्कार प्रदान

इमेज
 डॉ.एकनाथ घ.मुंडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान ज्योतिष शास्त्रातील अद्वितीय कार्याबद्दल पुणे येथील ज्योतिष महासंमेलनामध्ये पुरस्कार प्रदान _____________________________ परळी (प्रतिनिधी):दिनांक ३१ ऑगस्ट महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरामध्ये  दिनांक २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान संपन्न झालेल्या ज्योतिष महासंमेलनामध्ये   डॉ.एकनाथ घनश्यामराव मुंडे यांना ज्योतिष शास्त्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जन्मगाव नाथरा असणारे डॉ.एकनाथ घ. मुंडे हे परळी वैजनाथ येथील रहिवासी असून गेली ५० वर्ष श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या मूलमंत्राला एकनिष्ठ राहून समाजातील गरीब गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या  रुग्णांची सेवा करीत आहेत आणि रुग्णसेवेसोबत समाजसेवेचा वसाही त्यांनी घेतला आहे. वैद्यकशास्त्रासोबतच ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आणि आवड  असणारे डॉ. एकनाथ मुंडे यांनी वैद्यकशास्त्राला ज्योतिषशास्त्राची साथ जोडली आणि हजारो रुग्णांवर ज्योतिषवैद्यक शास्त्राच्या पद्धतीने उपचार करून त्यांना त्या...