सर्व स्तरातून अभिनंदन...

 प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय ‘एकता रंगकर्मी प्रबोधन रत्न पुरस्कार’ जाहीर



छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:

 शैक्षणिक, नाट्य, चित्रपट, साहित्य ,सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, नाट्यशास्त्र विभाग, संत रामदास महाविद्यालय, घनसावंगी यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा ' एकता रंगकर्मी प्रबोधन रत्न पुरस्कार २०२६'जाहीर झाला आहे. 'जनहित मराठी वृत्तसमूह' आणि 'एकता फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने त्यांच्या अडीच दशकांच्या सेवाव्रताचा हा यथोचित गौरव करण्यात येत आहे.

प्राध्यापक, अभिनेता, दिग्दर्शक, समीक्षक आणि लेखक अशा विविध भूमिकांतून कलेला प्रबोधनाचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या डॉ.सिद्धार्थ तायडे यांच्या निवडीची घोषणा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड,जनहित मराठीचे मुख्य संपादक के. बी. शेख, कार्यकारी संपादक प्रा. इम्रान शेख आणि एकता फाउंडेशनचे विभागीय अध्यक्ष प्रा. प्रकाश वाकळे,जिल्हाध्यक्ष पु. ना. बारडकर यांनी केली आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि.२६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी  बारा वाजता साई नाट्यगृह, सेलू जि. परभणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या निवडीबद्दल प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...