४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार..
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या शहराध्यक्षपदी महादेव गंगणे पाटील यांची नियुक्ती
नियुक्तीनंतर खा. बजरंग बप्पा सोनवणे यांनी सत्कार करत दिल्या शुभेच्छा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे व बीड जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सूचनेनुसार महादेव सोपानराव गंगणे पाटील यांची परळी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी नुकतीच ही घोषणा केली. प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी महादेव गंगणे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला.
या निवडीनंतर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. तसेच महादेव गंगणे हे यापुढे जनसेवा करत पक्षाच्या बळकटीकरणासाठी कार्यरत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महादेव गंगणे यांनीही खा. बजरंग सोनवणे यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले.
*महादेव गंगणे यांचा राजकीय प्रवास*
* दीर्घ अनुभव : महादेव गंगणे हे १९९९ पासून शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यरत आहेत.
* सक्रिय सहभाग : त्यांनी सक्रिय राजकारणात पक्ष विस्तार आणि संघटन बळकटीकरणासाठी मोठे योगदान दिले आहे.
* लोकसंपर्क : नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांचा अल्पमताने पराभव झाला असला, तरी त्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा असल्याचे मानले जाते.
*पक्षाची भूमिका आणि अपेक्षा*
जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विश्वास व्यक्त केला की, महादेव गंगणे यांच्या जिद्दी आणि चिकाटीच्या स्वभावाचा फायदा पक्षाला आगामी काळात होईल. "सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गंगणे नेहमीच तत्पर असतात, त्यामुळे शहरात पक्ष अधिक बळकट होईल," असे मत मस्के यांनी व्यक्त केले.
मी जनतेच्या व पक्ष नेतृत्वाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहणार : महादेव गंगणे
पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहण्यासाठी जनसेवा करत पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. सोबतच सत्ताधारी पक्षाला त्यांच्या चुकीच्या कामांसाठी वेळवेळी जनतेची साथ घेत जाब विचारत राहणार अशी भावना व्यक्त करत. पक्ष नेतृत्व व सहकाऱ्यांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा