घवघवीत यश .....सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेजचा विद्यापीठ परीक्षेत दैदिप्यमान निकाल




परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

        येथील वैद्यनाथ सर्वांगीण विकास प्रतिष्ठान संचलित 'वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेज'ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कॉलेजचा निकाल अत्यंत उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

    विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालानुसार, कॉलेजमधील विविध सत्रांचा निकाल देदीप्यमान लागला आहे. बीएससी नर्सिंग  ३ रे सेमिस्टर: ८०%,  बीएससी नर्सिंग४ थे सेमिस्टर: ९२.४५%, बीएससी नर्सिंग ५ वे सेमिस्टर: १००% (पूर्ण निकाल),बीएससी नर्सिंग ६ वे सेमिस्टर: ९७.०५%,  बीएससी नर्सिंग ७ वे सेमिस्टर: १००% (पूर्ण निकाल) विशेष म्हणजे ५ व्या आणि ७ व्या सेमिस्टरचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

       या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक  डॉ. सूर्यकांत मुंडे  आणि प्रशासकीय अधिकारी  शेख सर यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राम होळंबे ,  अशोक हेंगे, घुले मॅडम, सविता मॅडम,  मयूर सर, कृष्णा सर तसेच कॉलेजमधील सर्व टीचिंग आणि नॉन-टीचिंग स्टाफने यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. कॉलेजच्या या यशामुळे परळी शहराच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...