जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना  बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या - अनिल बोर्डे 

 गेवराई( प्रतिनिधी) खरीप हंगाम सन 2026- 27 सोयाबीन वितरण या घटकासाठी निवड झाली आहे. सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी आपण कृषी बियाणा चा लाभ घ्यावा विभाग यांच्याशी संपर्क साधावा असे संदेश शेतकरी ग्राहकांना प्राप्त झाले आहेत व सदरील आज पासून   पाच दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा असे संदेश शेतकरी ग्राहकांना प्राप्त झाले आहेत परंतु प्रत्यक्षात कृषी विभागाकडे किंवा संबंधित एजन्सीकडे बियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.  नियुक्त कृषी विक्रेत्याकडे बियाणे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे शेतकरी ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे हे योग्य नाही तरी कृषी विभागाने शेतकरी ग्राहकांना तात्काळ शासनाचे  बियाणे उपलब्ध करून द्यावेत. शेतकरी ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

यासाठी संदेश, सातबारा, आठ अ, आधार कार्ड,फॉर्मर आयडी अशी कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तरी कृषी विभागाने तात्काळ बियाणे उपलब्ध करून शेतकरी ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी केली आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!