लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पुण्यतिथी निमित्त स्व. गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
परळी वैजनाथ दि.०३ (प्रतिनिधी)
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात केंद्रीय ग्रामविकास मंत्री, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख, संचालिका छायाताई देशमुख, कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना संजय देशमुख म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य आजही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यांचे मराठवाड्याच्या विकासात मोठे योगदान आहे. ते संघर्षनेते होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रविण फुटके यांनी तर आभार प्रा अशोक पवार यांनी मानले. कार्यक्रमास प्रा डॉ विना भांगे, प्रा विशाल पौळ, दिपक सातपुतेसह प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा