खळबळजनक घटना......गंभीर प्रकार

 परळी तालुक्यात आर्थिक व्यवहारातून खून; मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोप

परळी वैजनाथ, दि. ३ जून — परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आर्थिक व्यवहाराच्या वादातून झालेल्या खुनाप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
        पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोजखान खैरातीखान  पठाण (रा. सरदारनगर, परळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपी  विरुद्ध भारतीय न्याय संहिता  कलम 103(1), 238 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव अफजलखान उर्फ तोहिद केरातीखान पठाण (वय 36, रा. सरदारनगर, परळी) असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार,  दोन आरोपींनी संगनमत करून आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून अफजलखान याचा खून केल्याचा आरोप आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह परळीजवळील लेंडेवाडी शिवारातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर फेकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 31 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 1 जून दरम्यान घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 3 जून रोजी रात्री 9.13 वाजता ऋषिकेश परमेश्वर फड (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) आणि गौरव दीपक व्यास (रा. स्नेहनगर, परळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे  या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपींच्या हालचाली व घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलीसांकडून करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार