दुर्मिळ ‘संत जगमित्रनागा अभंग गाथे’चे  माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन



अतिशय दुर्मिळ ठेवा असलेल्या या अभंग गाथेचा व्यापक प्रसार व्हावा- आ. धनंजय मुंडे

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

     वारकरी संप्रदाय, संत साहित्य आणि अध्यात्मिक अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दुर्मिळ ‘संत जगमित्रनागा अभंग गाथे’चे प्रकाशन माजी मंत्री  आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीतील जगमित्र कार्यालयात संपन्न झाले. 

        संत साहित्याचे अभ्यासक व संत जगमित्र नागा चरित्र ग्रंथाचे लेखक ह भ प एड. दत्तात्रय आंधळे संपादित या गाथेमध्ये संत जगमित्रनागा यांच्या दुर्मिळ अभंगांचा समावेश करण्यात आला असून त्यांचा सोपा भावार्थही देण्यात आला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार तसेच संत साहित्यप्रेमींसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

      संत साहित्याचे अभ्यासक व साहित्यिक ॲड. दत्तात्रेय आंधळे यांनी या गाथेचे लेखन केले आहे. यापूर्वीही त्यांनी विविध चरित्रग्रंथ प्रकाशित केले असून संत साहित्य क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. संत जगमित्रनागा यांचे जीवनकार्य, अध्यात्मिक विचार आणि अभंग साहित्याचा व्यापक प्रसार व्हावा या उद्देशाने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.परळी वैजनाथ येथील संत जगमित्रनागा यांच्या चरित्रासह त्यांच्या अभंगांचा अभ्यासपूर्ण आढावा या गाथेत घेण्यात आला आहे. त्यामुळे संत साहित्य क्षेत्रातील ही एक दुर्मिळ आणि अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा ठरणार असल्याचे मत आ धनंजय मुंडे यांनी  व्यक्त केले.

      या प्रकाशन कार्यक्रमास युवक नेते अजय मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, न. प. गटनेते वैजनाथ सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अयुब खान पठाण, पत्रकार प्रा. रविंद्र जोशी, गोविंद केंद्रे, सदाशिव देशपांडे, बाबुराव रुपनर यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!