पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....
परळीत बनावट पानमसाला वाहतूक उघड; 6.24 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण अटकेत
परळी वैजनाथ, दि. 3 जून :
परळी शहरातील उड्डाण पुलाजवळ अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून प्रतिबंधित व बनावट पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत पानमसाल्याचा साठा, वाहन व इतर साहित्य असा एकूण 6 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रामा टायरजवळ उड्डाण पुलाखाली रोडवर संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी सचित आनंदराव धर्माधिकारी (वय 42, रा. लातूर) याच्या ताब्यातून प्रतिबंधित पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विविध ब्रँडच्या पानमसाल्याच्या गोण्या, पिशव्या तसेच वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार (MH-12 JU 7952) यांचा समावेश आहे. तपासादरम्यान पानमसाल्याचा साठा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थांच्या श्रेणीत येत असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पानमसाल्याचा साठा, वाहन आणि इतर साहित्य असा 6.24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे परिसरातील अवैध पानमसाला व्यापार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा