इमेज
परळी सकल मातंग समाजाच्या वतीने अ.ब.क.ड आरक्षण उपवर्गीकरणासाठी तहसिल कार्यलय समोर धरणे आंदोलन व निदर्शने  परळी/ प्रतिनिधी  सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे अ ब क ड उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी परळी तहसील कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक ३ जून २०२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.   दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी दविंदर सिंग पंजाब सरकार या खटल्यात सुप्रीम कोर्टाच्या सात बेंचच्या पीठाने ६:१ असा निर्णय देऊन अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली असून. हरियाणा, हिमाचल प्रदेश ,कर्नाटक, पंजाब , तेलंगणा सह पाच राज्यांनी उप वर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे .महाराष्ट्रात 14 ऑक्टोबर 2025 रोजी यासंदर्भात न्यायमूर्ती बद्दर यांची समिती नेमली असून समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप उपवर्गीकरणाचा निर्णय होत नसल्याने परळी तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने आज दिनांक 3 जून 2026 रोजी तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात...

 डॉ. संतोष मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश; एसटीच्या 'शिवाई' आणि 'स्लीपर' बसेसमध्ये दिव्यांगांसाठी जागा आरक्षित!



परळी वैजनाथ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दिव्यांग प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या अत्याधुनिक 'शिवाई' आणि 'शयनयान' (स्लीपर) बसेसमध्ये आता दिव्यांग प्रवाशांसाठी जागा (सीट्स) राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या 'दिव्यांगांच्या दारी' अभियानाचे उपाध्यक्ष मा. डॉ. श्री. संतोष मुंडे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या मागणी व पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या संदर्भात महामंडळाच्या वाहतूक खात्याने अधिकृत पत्रक जारी केले आहे.


बसेसमधील आरक्षित आसन क्रमांक खालीलप्रमाणे :

* शिवाई बसेस: आसन क्रमांक ३, ४, ५, आणि ६ दिव्यांगांसाठी राखीव.


* विना वातानुकूलित शयनयान (Non-AC Sleeper): आसन क्रमांक ७ राखीव.

* विना वातानुकूलित शयनयान/आसनी (Sleeper/Seating) बसेस: आसन क्रमांक ६ राखीव.

या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांचा एसटी बसमधील प्रवास अधिक सुकर, सुटसुटीत आणि आरामाचा होणार आहे. महामंडळाकडे डॉ. संतोष मुंडेंनी केलेल्या मागणीला यश आल्याबद्दल दिव्यांग बांधव, विविध संघटना आणि प्रवाशांकडून अभिनंदन व स्वागत केले जात आहे.

अशा या निर्णयाबद्दल राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक,माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे, ना.पंकजाताई मुंडे तसेच डॉ.संतोष मुंडे यांचे सर्व दिव्यांग बांधवांकडून आभार मानले जात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या