पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....

इमेज
माझ्यासोबत पळून नाही आलीस तर कुटुंबाला जिवंत सोडणार नाही ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच "तू माझ्याशी बोलत नाहीस" तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजो...

पोलीस  दत्तात्रय बळवंत  लाच घेताना पकडला 

नेकनुर,

जिल्ह्यातील लाचखोरी दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील नेकनुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. 6) दुपारी नेकनुर पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. लाचखोर आरोपीला घेऊन लागलीच एसीबीचे कर्मचारी नेकनूरमधून बाहेर पडले. बीडमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील काम करण्यासाठी संबंधित अंमलदाराने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेकनुर पोलीस ठाण्याच्या परिसरात कारवाई करत अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेला हा कर्मचारी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काही महिन्यांपूर्वी शेतातील पवनचक्की लाईनच्या कारणावरून झालेल्या वादात संबंधित अंमलदार एका तरुणास “कॅरेक्टर खराब करून टाकीन” अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतरही त्याच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता लाच स्वीकारताना झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा नेकनुर पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या