परळीत वंदे मातरम सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अशोकजी जोशी यांची १४ वी पुण्यतिथी

स्व.अशोकजी जोशी यांचे राष्ट्रनिष्ठ विचार सदैव प्रेरणादायी- दिलीप जोशी

परळी,(प्रतिनिधी):-

     राष्ट्रनिष्ठ, संघर्षशील आणि ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या वंदे मातरम सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अशोकजी  जोशी यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शासकीय विश्रामगृहात  अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

     कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अशोकजी  जोशी यांच्या प्रतिमेस वंदे मातरम सेनेचे अध्यक्ष दिलीप जोशी, उपाध्यक्ष बालासाहेब गित्ते, मनोजराव जबदे, मराठवाडा युवक अध्यक्ष शेख इरफान, शिवसेना नेते संजय कुकडे, मुन्ना अरणकल्ले, विकासराव मुंडे, शंकरराव इंदुलकर, भानुदास उफाडे, भैय्या इंदुरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले. यावेळी बोलताना वंदे मातरम सेनेचे अध्यक्ष दिलीप  जोशी म्हणाले की, अशोकजी जोशी हे केवळ एका संघटनेचे संस्थापक नव्हते, तर राष्ट्रभक्तीची विचारधारा युवकांच्या मनामनात रुजवणारे प्रेरणास्रोत होते. त्यांनी  तरुणांमध्ये देशभक्तीची चेतना जागवली. मुंबईतील गुन्हेगारीला कठोरपणे आव्हान देत मराठी माणसाला सन्मानाने आणि निर्भयपणे जगण्यासाठी संघर्ष केला. पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी निडर आणि निर्भीड संपादकांची फळी उभी करून समाजजागृतीचे ऐतिहासिक कार्य केले.यावेळी बालासाहेब गित्ते आणि संजय  कुकडे यांनीही स्वर्गीय अशोकजी  जोशी यांच्या जीवनकार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. कार्यक्रमास वंदे मातरम सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...