परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल....

शासकीय कामकाजात अडथळा: परळीत एसआयआर चे काम करणाऱ्या बीएलओ ला मारहाण

परळी वैजनाथ | प्रतिनिधी.....

    परळी वैजनाथ शहरातील पेठ मोहल्ला परिसरात सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै 2026 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादी महेफूज जाकीर शेख (वय 42, व्यवसाय- शिक्षक, रा. मलिकपूरा, परळी वैजनाथ) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, 17 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता पेठ मोहल्ला परिसरातील अब्दुल हमीद शादीखाना येथे फिर्यादी हे एस आय आर मोहिमेचे शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपींनी संगनमत करून त्यांच्या हातातील शासकीय कामकाजाची कागदपत्रे हिसकावून घेतली. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

      या प्रकरणी शेख शाकेर अहमद, शेख जुनेद, शेख शोएब (सर्व रा. पेठ मोहल्ला, परळी वैजनाथ) तसेच आणखी अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(1), 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा क्रमांक 190/2026 दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काळे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...