न्यायासाठी शेवटपर्यंत सोबत राहण्याची दिली ग्वाही..

ना.पंकजा मुंडेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मदतीचा चेक घेऊन मयत विलास घुलेच्या पत्नी व कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

केज दि. १६ ---

तालुक्यातील टाकळी गावचा युवक स्व. विलास घुलेच्या पत्नी व कुटुंबियांची राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाखाचा मदतीचा धनादेश घुलेच्या पत्नीकडे सुपूर्द केला. न्यायासाठी शेवटपर्यंत सोबत राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


  मागील महिन्यात टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या एका घटनेत विलास घुले या युवकाचा हकनाक बळी गेला होता, त्याच्या दुर्देवी मृत्यूमुळे घुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घुले परिवाराच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत पाठिशी असल्याचे सांगत ना. पंकजाताई मुंडे यांनी त्याच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने पाच लाखाची मदत जाहीर केली होती. आज संध्याकाळी बीड कडे जाताना त्यांनी टाकळीत जाऊन घुले परिवाराची सांत्वनपर भेट घेतली आणि मदतीचा चेकही दिला. न्यायासाठी शेवटपर्यंत सोबत राहण्याची ग्वाही त्यांनी घुले कुटुंबास दिली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...