मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन...

 सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आज परळीत शिक्षणप्रेमी व नागरिकांची निदर्शने 








परळी, प्रतिनिधी.         

   जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ , शिक्षणप्रेमी  व पर्यावरण तज्ञ सोनम वांगचूक यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा साठी व केंद्रीय शिक्षण मंत्री महेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यसाठी दिल्ली येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक 17 जुलै रोजी परळीतील शिक्षण प्रेमी व तमाम नागरिकांच्या वतीने सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. 

    नीट, टीईटी आदी परीक्षांचे होणारे पेपर लिक होत असल्यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे .शिक्षण व्यवस्थेतील या गैरकारभाराची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री महेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या 18 दिवसापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रो जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि शिक्षणप्रेमी  व पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. 

   केंद्र सरकारच्या निषेधार्थ व सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच देशातील शिक्षण व्यवस्थेतील व परीक्षातील घोटाळे आणि गैरव्यवहार यांना जबाबदार असणाऱ्या मंत्री महेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उद्या दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर येथे परळीतील शिक्षण प्रेमी तसेच सर्व नागरिकांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. या निदर्शनास शिक्षण प्रेमी तसेच परळीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...