सर्व स्तरांतून अभिनंदन!!!!

 फार्म डी तृतीय वर्ष परीक्षेत कु. श्रुती क्षिरसागरचे उज्ज्वल यश

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

     परळी वैजनाथ येथील किसान ट्रॅक्टरचे संचालक तथा दै. मराठवाडा साथीचे विशेष प्रतिनिधी संजय क्षिरसागर यांची कन्या कु. श्रुती संजय क्षिरसागर हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत लोणी येथील प्रवरा रुरल कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत घेण्यात आलेल्या फार्म डी (डॉक्टर ऑफ फार्मसी) तृतीय वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

कु. श्रुती हिने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले असून तिच्या या यशामुळे क्षिरसागर परिवारासह परळी शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवर्ग, क्षिरसागर परिवारातील सदस्य, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यातील उच्च शिक्षण आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...