आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्षपदी बाळकृष्ण फुले यांची निवड



परळी वैजनाथ : प्रतिनिधी.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल परळी वै. शहराध्यक्षपदी बाळकृष्ण  अनंतराव फुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र आज राज्याचे माजी मंत्री तथा परळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा ना. सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार बाळकृष्ण फुले यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष आयुब खान पठाण, सरचिटणीस अनंत इंगळे आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहर व परिसरातील ओबीसी समाजाच्या विविध  प्रश्नांनवाचा फोडण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी बाळकृष्ण फुले यांनी प्रभावीपणे काम करावे अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात  आली आहे.

     या नियुक्तीबद्दल बाळकृष्ण  फुले यांचे  पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांतून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजाच्या संघटनात्मक  कार्याला अधिक गती देऊन निष्ठापूर्वक काम करू असा संकल्प नवनियुक्त शहराध्यक्ष बाळकृष्ण फुले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार