पुणे येथील ज्योतिष महासंमेलनामध्ये पुरस्कार प्रदान
डॉ.एकनाथ घ.मुंडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
ज्योतिष शास्त्रातील अद्वितीय कार्याबद्दल पुणे येथील ज्योतिष महासंमेलनामध्ये पुरस्कार प्रदान
_____________________________
परळी (प्रतिनिधी):दिनांक ३१ ऑगस्ट
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरामध्ये दिनांक २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान संपन्न झालेल्या ज्योतिष महासंमेलनामध्ये
डॉ.एकनाथ घनश्यामराव मुंडे यांना ज्योतिष शास्त्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जन्मगाव नाथरा असणारे डॉ.एकनाथ घ. मुंडे हे परळी वैजनाथ येथील रहिवासी असून गेली ५० वर्ष श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या मूलमंत्राला एकनिष्ठ राहून समाजातील गरीब गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रुग्णांची सेवा करीत आहेत आणि रुग्णसेवेसोबत समाजसेवेचा वसाही त्यांनी घेतला आहे.
वैद्यकशास्त्रासोबतच ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आणि आवड असणारे डॉ. एकनाथ मुंडे यांनी वैद्यकशास्त्राला ज्योतिषशास्त्राची साथ जोडली आणि हजारो रुग्णांवर ज्योतिषवैद्यक शास्त्राच्या पद्धतीने उपचार करून त्यांना त्यांच्या शारीरिक व मानसिक व्याधीतून बाहेर काढले आणि त्यांना समाधानी जीवनाची अनुभूती दिली.
ज्योतिषवैद्यक शास्त्राचा सखोल अभ्यासक म्हणून ओळख निर्माण करताना डॉ एकनाथ मुंडे यांनी मेडिकल एस्ट्रोलॉजी मधेही त्यांनी प्राविण्य मिळविले आणि जनकल्याणासाठी ज्योतिष विषयक शेकडो लेख लिहून विविध मासिकांमधून प्रसिद्ध केले.
त्यांनी लिहिलेल्या लेखांमधून देखील हजारो नागरिकांच्या अंधारमय जीवनात आनंदाची प्रकाश झोत निर्माण करण्याचे मोलाचे कार्य डॉ मुंडे यांनी केले.
प्रत्येक वर्षी होणाऱ्या ज्योतिष संमेलनांमध्येही डॉ एकनाथ मुंडे यांच्या ज्योतिष विषयक लेखनाचे तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे आणि विशेष करून त्यांच्या ज्योतिष शास्त्रातील अतुलनीय आणि अद्वितीय कार्याचे अवलोकन केले जाते.
ज्योतिषवैद्यक शास्त्रातील त्यांच्या अखंड अविरत कार्याबद्दल आणि योगदानाबद्दल या आधीही त्यांना ज्योतिष पद्म ,ज्योतिष भूषण,ज्योतिष शिरोमणी, मेडिकल एस्ट्रोलॉजिस्ट असे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत
ज्योतिषवैद्यक शास्त्राचा आपल्या समाजासाठी अथांग उपयोग करून जनकल्याणाचे अविरत कार्य करणाऱ्या डॉ एकनाथ मुंडे यांचा व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी चंद्रवल्लभ प्रकाशन पुणे व ज्योतिष महासंमेलनाचे मुख्यआयोजक चंद्रकांतजी शेवाळे यांच्या वतीने हा जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.अशा या जीवन गौरव पुरस्काराबद्दल डॉ एकनाथ मुंडे यांच्यावर समाजातील सर्व घटकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा