जेजुरी संस्थानचे विश्वस्त तसेच जेजुरीचे नगराध्यक्ष यांच्यासह परळीत मान्यवरांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
परळी वैजनाथ : प्रतिनिधी — श्रावण महिन्याच्या पावन पर्वात धार्मिक स्थळांना भेटी देत असताना मार्तंड देवस्थान, जेजुरीचे विश्वस्त तथा जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप भैय्या बारभाई, नगरसेवक योगेश भैय्या जगताप, जेजुरीचे सामाजिक कार्यकर्ते वैभव कोरपड, सुरेश राऊत व प्रशांत कापसे या मान्यवरांनी परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी परळीकरांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनीही त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र सोनी यांची उपस्थिती होती.जेजुरी आणि परळी या दोन प्रमुख धार्मिक स्थळांमधील भक्तिभावाचे नाते अधिक दृढ करणारा हा प्रसंग ठरला. दर्शनावेळी मान्यवरांनी प्रभू वैद्यनाथाची पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा