पोस्ट्स

MB NEWS:स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी वैजनाथ गुट्टे यांची निवड

इमेज
 स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी वैजनाथ गुट्टे यांची निवड वैजनाथ गुट्टे यांच्या निवडीचे सर्वस्तरातुन अभिनंदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीसपदी वैजनाथ गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. यानिवडीचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यानिवडीबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गुट्टेवाडी येथील व नेहमीच गोरगरीबांच्या कार्यासाठी धडपडणारे व्यक्तीमत्व तसेच सामाजिक कार्यात सक्रीय योगदान देणारे वैजनाथ सोनबा गुट्टे यांची नुकतीच यांच्या कार्याची दखल घेऊन आकांशा फाऊंडेशन प्रणित, एक लढा लोकहितांसाठी, आपल्या माणसांसाठी... स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे यांनी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीसपदी नियु्नती एका पत्राद्वारे जाहिर केली आहे. यानिवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष विजय बडे, योगेश केंद्रे, संतोष टाक, अंजली जावळेकर, सोनम अदाने सारिका, गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक भागातील नागरिकांनी सोशल मिडीयाच्या व मोबाईल दु...

MB NEWS:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी अशोक डक उप सभापती वाडकर

इमेज
  सभापती पदी अशोक डक उप सभापती वाडकर  नवीमुंबई: पुढारी वृतसेवा  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची आज झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद महसूल मधून निवडूण आलेले अशोक डक हे सभापती तर पुणे महसूल विभागातून निवडूण आलेले धनंजय वाडकर हे बिनविरोध निवडून आले.  यावेळी आमदार  व संचालक शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी एकमताने सभापती पदासाठी अशोक डक यांच्या बाजूने कोल दिला. तर काॅग्रेस कडून धनंजय वाडकर यांच्यासाठी संग्राम थोपटे यांनी कंबर कसली होती. त्यामुळे उप सभापती पदी वाडकर यांची वर्णी लागली.  सकाळी बारा वाजता ही निवडणूक सुरू झाली.

MB NEWS:विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक*

इमेज
 *विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक* पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी आज (दि. 31) पंढपुरात वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. यामुळे मंदिर परिसराला छावणाचे स्वरुप आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर हे आंदोलनात सहभागी झाले असून येथे हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी आहे. त्यांनी एक लाख भाविकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात एक हजारच्या आसपास भाविक विशेषतः वंचितचे कार्यकर्त उपस्थित आहेत.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्रिस्तरीय बंदोबस्त असून 450 पोलिस  अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत, मंदिर परिसर सील केला आहे. आंदोलकांना पोलिसांनी शिवाजी चौक येथे अडवले आहे.

MB NEWS:कामगार कल्याण मंडळाकडून ४३ हजार कामगारांना मास्कचे वाटप कोरोना संसर्गापासून बचावासाठी कामगारांना झाली मदत

इमेज
कामगार कल्याण मंडळाकडून ४३ हजार कामगारांना मास्कचे वाटप  कोरोना संसर्गापासून बचावासाठी कामगारांना झाली मदत    परळी दि. ३१ ऑगस्ट २०  कोरोना संसर्गाची लागण कामगारांना होऊ नये व कामगार सुरक्षित राहावेत म्हणून कामगार कल्याण मंडळाने  राज्यातील ४३ हजार कामगारांना विनामूल्य मास्कचे वाटप केले आहे.  कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने व  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने  राज्यातील मुंबई, ठाणे,  पुणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला व नागपूर या विभागांतर्गत चालणाऱ्या २३० कामगार कल्याण केंद्रातून ४३ हजार कामगारांना मास्क वाटप करण्यात आले.  गेल्या तीन  महिन्यापासून कामगारांना मास्कचे वाटप होत आहे. यामुळे कोरोना संसर्गापासून कामगारांना संरक्षण मिळण्यास मदत झाली.  बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगारांनाही मास्कचे  वितरण करण्यात  आले आहे.  विशेष म्हणजे हे सर्व मास्क  कामगार कल्याण केंद्राच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वतः तयार केलेले आहे.  कामगार मंडळातर्फे दरवर्षी कामगार कुटुंबातील ...

MB NEWS: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

इमेज
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन  आणि  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे  उद्घाटन * अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन  आणि  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाले*

MB NEWS:*प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती*

इमेज
*प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.      याबाबतचे नियुक्ती पत्र नुकतेच प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी प्रदान केले आहे. यावेळी अॅड.जीवनराव देशमुख, संतोष शिंदे, गिरीश भोसले, महादेव शिंदे, लक्ष्मण वाकडे, दत्तात्रय काळे, आदी उपस्थित होते. सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

MB NEWS:*आज 80 करोना पेशंटला मिळणार सुट्टी*

इमेज