पोस्ट्स

इमेज
परळी छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील फुलारी; सचिवपदी सोमनाथ वळसे, उपाध्यक्षपदी गोविंद विजापुरे यांची बिनविरोध निवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नाथ रोड येथील सुयोग फोटो वर्ल्डच्या सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील (नाना) फुलारी, सचिवपदी सोमनाथ (काका) वळसे आणि उपाध्यक्षपदी गोविंद विजापुरे यांची एकमताने निवड करण्यात आली. सुनील फुलारी यांची अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली असून, गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी संघटनाबांधणी, छायाचित्रकारांचे हितसंवर्धन, व्यवसायातील तांत्रिक प्रगती, आर्थिक सक्षमीकरण तसेच समाजाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. छायाचित्रकारांच्या आरोग्याविषयी जनजागृती आणि विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. गेल्या ३० वर्षांपासून परळीतील छायाचित्रण क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून, "नाना" या नावाने ते सर्वपरिचित आहेत. उपाध्यक्षपदी निवड झालेल...

लाल बावटा घर कामगार युनियनच्या वतीने कार्यक्रम.....

इमेज
  घरेलू कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव व अर्थिक मदत प्रदान प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षणाची तळमळ व गुणवत्ता प्रेरणास्पद – नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी          लाल बावटा घर कामगार युनियनच्या वतीने परळी शहरातील नोंदणीकृत घरेलू कामगारांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच युनियनच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला ₹1,000 ची आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली.          परळीतील जाजूवाडी जवळील सिटू कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करून आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितलेकी, घरेलू कामगार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम ...

आष्टी आगाराच्या वाहक आलिशा बागवान यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक...

इमेज
  महिला वाहकाचा धाडसीपणा; पाठलाग करून सोनसाखळी चोरणारी महिला जेरबंद वृद्ध प्रवाशी महिलेचे एक तोळ्याचे दागिने सुरक्षित परत कडा : बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत वृद्ध प्रवासी महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने चोरून पसार होणाऱ्या एका महिलेचा आष्टी आगाराच्या महिला वाहकाने धाडसी पाठलाग करून तिला रंगेहात पकडले. या प्रसंगामुळे वृद्ध महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळाले. शनिवारी सायंकाळी कडा-मिरजगाव मार्गावरील बसमध्ये ही घटना घडली. आलिशा बागवान या आष्टी आगारात महिला वाहक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सायंकाळी मिरजगावहून कड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका महिलेने वृद्ध प्रवासी महिलेच्या पिशवीवर लक्ष ठेवले. संधी साधून तिने पिशवी हिसकावली आणि बसमधून उतरून पळ काढला. वृद्ध महिलेने आरडाओरड केल्यानंतर आलिशा बागवान यांनी क्षणाचाही विलंब न करता बसमधून उतरून चोरट्या महिलेचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांनी तिला पकडून तिच्याकडील पिशवी ताब्यात घेतली. पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये वृद्ध महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याच...

संजय मुंडे यांच्या पुढाकारातून टोकवाडीतील विधवा महिलेच्या मुलांच्या शिक्षणासाठी दहा हजारांची आर्थिक मदत

इमेज
ना.पंकजाताई मुंडे यांच्या सामाजिक दायित्वाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! संजय मुंडे यांच्या पुढाकारातून टोकवाडीतील विधवा महिलेच्या मुलांच्या शिक्षणासाठी दहा हजारांची आर्थिक मदत परळी वैजनाथ, प्रतिनिधी :        राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त खर्चिक कार्यक्रम टाळून गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात देणारे सामाजिक उपक्रम राबविण्याचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत टोकवाडी येथे भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एका विधवा महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श उपक्रम राबविला.        टोकवाडी येथील श्रीमती कुशावर्ती सतीश हरेगावकर या विधवा महिलेवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असून त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सर्वसामान्य परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण होत असल्याची बाब लक्षात घेऊन भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांच्या सह महायुती च्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून कार्यकर्त्यांनी एकत्र येत 10 हजारांची आर्थिक मदत प्रदान केली. यावेळी "फूल नाही, फुला...
इमेज
नीट परीक्षेतील कमी गुणांचे टेन्शन? परळीतील विद्यार्थी बेपत्ता; वडिलांची पोलिसांत तक्रार परळी वैजनाथ | प्रतिनिधी देशभर गाजलेल्या नीट  परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवर वाढलेल्या मानसिक ताणाचे आणखी एक चिंताजनक उदाहरण परळी वैजनाथ येथे समोर आले आहे. नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आदित्य राठोड हा विद्यार्थी घरातून निघून गेल्याची घटना घडली असून, त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी आदित्यचे वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून विद्यार्थ्याचा शोध सुरू केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यला नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. निकाल लागल्यानंतर तो घरातून निघून गेला असून, त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोध घेतला; मात्र अद्याप तो सापडलेला नाही. नीट परीक्षा यंदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे देशभर चर्चेत राहिली. या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी अस्वस...

अश्विन मोगरकर यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र वितरकांना रेनकोट वाटप अश्विन मोगरकर यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम परळी वैजनाथ, प्रतिनिधी... पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा लोकप्रिय लोकनेत्या मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ व औपचारिक सत्कार टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या या विचाराला अनुसरून भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांच्या तर्फे रविवारी परळी वैजनाथ येथील ना. पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात वृत्तपत्र वितरकांना पावसापासून संरक्षणासाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले. परळी शहरातील विविध भागांत दररोज पहाटेपासून घराघरांत वृत्तपत्र पोहोचविणारे वितरक उन्हाची तमा न बाळगता तसेच मुसळधार पावसातही आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असतात. नागरिकांपर्यंत रोजच्या घडामोडी वेळेत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने मेहनत घेत असल्याने त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित वृत्तपत्र वितरकांना रेनकोटचे वितरण करण्यात आल...

ना. पंकजाताई मुंडे वाढदिवस>>>>प्रदीप कुलकर्णी यांचा विशेष अभिष्टचिंतन लेख

इमेज
  लोकनेत्याचा खरा वारसा ! ✍️ प्रदीप कुलकर्णी        महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने, आक्रमक नेतृत्वाने आणि जनमानसातील अढळ स्थानाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नेत्या म्हणजेच मा. पंकजाताई मुंडे... लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा राजकीय आणि सामाजिक वारसा तितक्याच ताकदीने पुढे नेणाऱ्या पंकजाताईंनी केवळ 'वारसदार' म्हणून नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे. ​लोकनेते मुंडे साहेबांच्या मुशीत घडलेल्या पंकजाताईंनी राजकारणाचे धडे घरातूनच गिरवले. मात्र, त्यांच्यातील नेतृत्वाची खरी चुणूक २००९ मध्ये महाराष्ट्राने पाहिली, जेव्हा त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत विधानसभेत पाऊल ठेवले. मुंडे साहेबांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली मोठी पोकळी आणि दुःख पचवत, त्यांनी केवळ स्वतःलाच सावरले नाही, तर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांना आणि वंचित, उपेक्षित, कष्टकरी ऊसतोड कामगारांना धीर दिला. ​  ​२०१४ ते २०१९ या काळात राज्याच्या ग्रामविकास, जलसंध...