अश्विन मोगरकर यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

 ना. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र वितरकांना रेनकोट वाटप अश्विन मोगरकर यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम





परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा लोकप्रिय लोकनेत्या मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ व औपचारिक सत्कार टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या या विचाराला अनुसरून भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांच्या तर्फे रविवारी परळी वैजनाथ येथील ना. पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात वृत्तपत्र वितरकांना पावसापासून संरक्षणासाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले.

परळी शहरातील विविध भागांत दररोज पहाटेपासून घराघरांत वृत्तपत्र पोहोचविणारे वितरक उन्हाची तमा न बाळगता तसेच मुसळधार पावसातही आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असतात. नागरिकांपर्यंत रोजच्या घडामोडी वेळेत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने मेहनत घेत असल्याने त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपस्थित वृत्तपत्र वितरकांना रेनकोटचे वितरण करण्यात आले. पावसाळ्यात वृत्तपत्र वाटप करताना त्यांना होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे अश्विन मोगरकर यांनी सांगितले.

याप्रसंगी सर्व वृत्तपत्र वितरकांनी मा. ना. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच केवळ शुभेच्छांपुरते न थांबता समाजातील कष्टकरी घटकांचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविल्याबद्दल भाजप शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांचे आभार व्यक्त केले.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, समाजातील विविध घटकांना प्रत्यक्ष मदत करणारे उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस अर्थपूर्ण आणि समाजहिताचा ठरविण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. हार-तुरे व औपचारिक सत्कारापेक्षा समाजासाठी उपयोगी पडणारे उपक्रमच त्यांच्या कार्यशैलीला साजेसे असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.

यावेळी अध्यक्ष नितीन समशेट्टे, बांधकाम सभापती पवन मुंडे, माजी नगराध्यक्ष अब्दुल करीम, नगरसेवक प्रणव मराठे, भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष समी शेख, संपादक ज्ञानोबा सुरवसे, कोषाध्यक्ष अनिष अग्रवाल, प्रिंटेश तोतला, खालेद राज, नरसिंग सिरसाट, खदीर भाई, विजयकुमार खोसे, मोहन जोशी, विकास हालगे, मुकेश पाटील, नारायण गर्जे, अनिस शेख,  दिलीप नेहरकर, पवन तोडकरी, कृष्णा बेदरकर, बाळासाहेब काटे आदी उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...