संजय मुंडे यांच्या पुढाकारातून टोकवाडीतील विधवा महिलेच्या मुलांच्या शिक्षणासाठी दहा हजारांची आर्थिक मदत
ना.पंकजाताई मुंडे यांच्या सामाजिक दायित्वाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
संजय मुंडे यांच्या पुढाकारातून टोकवाडीतील विधवा महिलेच्या मुलांच्या शिक्षणासाठी दहा हजारांची आर्थिक मदत
परळी वैजनाथ, प्रतिनिधी :
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त खर्चिक कार्यक्रम टाळून गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात देणारे सामाजिक उपक्रम राबविण्याचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत टोकवाडी येथे भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एका विधवा महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श उपक्रम राबविला.
टोकवाडी येथील श्रीमती कुशावर्ती सतीश हरेगावकर या विधवा महिलेवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असून त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सर्वसामान्य परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण होत असल्याची बाब लक्षात घेऊन भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांच्या सह महायुती च्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून कार्यकर्त्यांनी एकत्र येत 10 हजारांची आर्थिक मदत प्रदान केली. यावेळी "फूल नाही, फुलाची पाकळी" या भावनेतून गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत सामाजिक दायित्वाची जाणीव कृतीतून दाखवून दिली. पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाचा उद्देश केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांना आधार देण्याचा असल्याने आमच्या क्षमतेप्रमाणे आम्ही काहीतरी सामाजिक जबाबदारी पार पाडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनानुसार आम्ही हे योगदान देण्याचा प्रयत्न केला असल्याचे संजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांच्यासह तुकाराम (टी.डी.) मुंडे, माजी उपसरपंच बंडू काळे, युवा नेते गणेश मुंडे, जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष मुंडे, अमर रोडे, गोविंद मुंडे, दिलीप जाधव तसेच हरेगावकर कुटुंबीय उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा