मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, महासचिव संदीप लाहोटी यांचा परळीत होणार सत्कार व्यापारी, नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे- सुरेश टाक, गोपाळ कंकाळ, जगदीश लड्डा, नितीन अग्रवाल, जयप्रकाश लड्डा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, महासचिव संदीप लाहोटी आणि नूतन पदाधिकारी यांचा उद्या रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी परळीत भव्य सत्कार होणार आहे. व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यास व्यापारी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुवर्णकार समाजाचे जेष्ठ नेते सुरेश टाक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ कंकाळ, किराणा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश लड्डा व नितीन अग्रवाल, डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश लड्डा यांनी केले आहे. रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्रद्धा मंगल कार्यालय येथे नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, माजी नगराध्यक्ष...