आनंदराज आंबेडकर , बबनराव घोलप यांच्यासह अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

 उपवर्गीकरणाच्या विरोधात परळीत 10 ऑगस्ट रोजी महामोर्चा 

आनंदराज आंबेडकर , बबनराव घोलप यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती 

परळी/ प्रतिनिधी

     महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात राज्यात अनुसूचित जाती मध्ये फुट पाडण्याचे षडयंत्र राज्य सरकार करीत आहे.अनुसुचित जातीतील 59 जातींना दिलेल्या या आरक्षणाला व ऐक्याला तडा जाऊ नये यासाठी एस्सीतील सर्वच जातींचा  महामोर्चा दिनांक 10 ऑगस्ट  रोजी परळीत आयोजित करण्यात आला आहे.या मोर्चास रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने  आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

     10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चास सुरवात होईल. रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या महामोर्चात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप, भन्ते मुदितानंद, भन्ते महाविरो,लहुजी क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास पाथरीकर, सत्यशोधक समाज संघाचे लक्ष्मण शिंदे,होलार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुरनर ,लहुजी सेना प्रदेशाध्यक्ष, लक्ष्मण शिंदे सत्यशोधक परिषद महाराष्ट्र अध्यक्ष, रुक्मिणी ताई लोंढे, सिद्धार्थ शिनगारे बीड, विनोद खटके,लातुर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघाल्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून पुढे रेल्वे स्टेशन येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून , एक मिनार चौक,रेल्वे उड्डाणपूल, फुले नगर, सिद्धार्थनगर, भिमवाडी रोडे चौक, राणी लक्ष्मीबाई टावर मार्गे मोंढा मार्केट येथे पोहोचणार आहे तेथे या महामोर्चाचे भव्यसभेत रूपांतर होईल तसेच याच ठिकाणी मोर्चाच्या वतीने शासनाला महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात येईल. अशी माहिती SC उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती चे अध्यक्ष रोहिदास बनसोडे यांनी दिली. तर यावेळी मिलिंद घाडगे, सचिन कागदे यांनी मोर्चाचे स्वरुप विशद केले.

    महाराष्ट्रात अनुसूचित जाती मध्ये 59 जातींना अनुसूचित जाती मध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो. 26 जानेवारी 1950  भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आरक्षण सर्वांसाठी समान पातळीवर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. उपवर्रगीकरण झाले तर या जातींमध्ये फुट निर्माण होईल तसेच आरक्षणालाही धोका निर्माण होणार आहे.म्हणूनच अनुसूचित जातीतील ऐक्य अबाधित रहावे व सरकारचे मनसुबे उधळून लावण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी परळी वैजनाथ येथील या महामोर्चास परळी तालुक्यातील अनुसूचित जातीतील नेते,कार्यकर्ते, महिला व पुरुषांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती परळी यांच्या  वतीने करण्यात आले आहे.

     या पत्रकार परिषदेला भास्कर नाना रोडे, प्रा.दासू वाघमारे,रोहिदास बनसोडे,मिलिंद घाडगे, सुभाष वाघमारे,सचिन कागदे,गौतम आगळे,सुकेशनी नाईकवाडे,अनंत इंगळे,प्रा.संपत वाघमोडे,रवी मुळे, राहुल घोबाळे, नगरसेवक कार्तिक कांबळे,धम्मानंद क्षिरसागर, बाबासाहेब गायकवाड, प्रदीप भोकरे,रोडे यशपाल मुंडे, प्रशांत बनसोडे, संतोष घोडके आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार