इनरव्हील क्लबतर्फे स्तनपानाचे महत्त्व पटवून देत बाळांना ड्रेस, मातांना फळवाटप

परळी  : आईचे दूध हे बाळासाठी अमृतासमान असून त्यामध्ये पोषक घटक आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून विविध आजारांपासून त्याचे संरक्षण होते. तसेच आई आणि बाळातील भावनिक नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते, असे प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा आशा धुमाळ यांनी केले.

इनरव्हील क्लब परळी वैजनाथच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात स्तनपानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी नवजात बाळांना ड्रेसचे वाटप करण्यात आले, तसेच मातांना फळांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमास क्लबच्या अध्यक्षा आशा धुमाळ, सचिव शैलजा बाहेती, उपाध्यक्षा उमा समशेट्टी, एडिटर अनिता धुमाळ यांच्यासह श्रद्धा हालगे, दुर्गा राठोड, सुनीता वाघमोडे, शोभना सौंदळे, विजया दहिवाळ, छाया देशमुख आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार