पोस्ट्स

सप्टेंबर १३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आभाळाकडे डोळे, अल्लाहकडे साकडे; पावसासाठी मुस्लिम बांधवांची दुवा

इमेज
पावसासाठी परळीत मुस्लिम बांधवांची सामूहिक दुआ आणि नमाज ; सलग तीन दिवस इस्तिस्का नमाज आभाळाकडे डोळे, अल्लाहकडे साकडे; पावसासाठी मुस्लिम बांधवांची दुवा परळी : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी शेतीपिकांवर संकट निर्माण झाले असताना परळी शहरात मुस्लिम बांधवांनी पावसासाठी सामूहिक प्रार्थनेचा आधार घेतला आहे. परळी येथील ईदगाह मैदानावर सलग तीन दिवसांपासून ‘नमाझ-ए-इस्तिस्का’ आणि विशेष दुआ आयोजित करण्यात येत आहे. पावसासाठी करण्यात येणाऱ्या या सामूहिक प्रार्थनेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मुस्लिम बांधव सहभागी होत आहेत. पावसासाठी करण्यात आलेल्या या प्रार्थनेदरम्यान अनेक भाविक अत्यंत आर्ततेने अल्लाहकडे याचना करताना दिसून आले. “हे परवरदिगारा, रहमत की बारीश आता फरमा आणि आम्हा सर्वांना या संकटातून वाचव,” अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली. पावसाने दडी मारल्याने शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. अशा परिस्थितीत परळीतील मुस्लिम बांधवांनी पावसासाठी केलेली ही सामूहिक प्रार्थना धार्मिक सलोखा आणि निसर्गाविषयीची ...