पोस्ट्स

सप्टेंबर ६, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अधिसूचना निघाली नसल्याने पेच?

इमेज
  जन्म-मृत्यू नोंदणीसाठी नागरिकांची फरफट! तहसील की न्यायालय? अधिकार नेमका कोणाचा; नागरिक संभ्रमात परळी वैजनाथ | प्रतिनिधी नवीन कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी आदेश देण्याचे अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या तरतुदीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली अधिसूचना अथवा राजपत्र केंद्र सरकारकडून अद्याप जारी करण्यात आले नसल्याने न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परळी येथील न्यायालयाकडून अशा प्रकारची प्रकरणे दाखल करून घेण्यास स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, “जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार न्यायालयाकडे वर्ग झाले आहेत,” असे सांगून तहसील कार्यालयाकडूनही नागरिकांना परत पाठविले जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक जुन्या जन्म-मृत्यू नोंदी आवश्यक असलेल्या नागरिकांना शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, वारसा हक्क, पासपोर्ट, आधार व इतर विविध प्रशासकीय कामांसाठी जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मा...

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवा*

इमेज
  नाळवंडीतील पिडित चिमुकलीला न्याय देऊ ना. पंकजा मुंडेंचे बीड एसपींना निर्देश ; आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवा बीड दि. १२ --- नाळवंडी ता. पाटोदा येथील आठ वर्षाच्या चिमुकलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक असून यातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती कोर्टात चालवावे असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.     या प्रकरणी आज ना. पंकजाताईंनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना फोन करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यास सांगितले.  नाळवंडी गावातील एका आठ वर्षाच्या चिमकुलीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला. या घटनेने पिडीत चिमुकलीचे  कुटुंब भयभीत झाले आहे. घटनेतील  आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीवर कठोरात कठोर शासन करावे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. ••••

ना. पंकजा मुंडे यांची युवा शेतकरी संघर्ष समितीला ग्वाही...

इमेज
  माजलगांव धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय ; मंत्रालयात बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू ना. पंकजा मुंडे यांची युवा शेतकरी संघर्ष समितीला ग्वाही मुंबई दि. १२ ---- माजलगांव (जि.बीड) येथील धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला गेल्याने परिसरातील बावीस गावातील शेतकरी हवालदिल झाले असून याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी युवा शेतकरी संघर्ष समितीला दिली.     माजलगांव धरण परिसरातील बावीस गावच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांनी आज माजलगांव मधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यां मार्फत ना. पंकजाताई मुंडे यांच्याशी संपर्क साधून हा सर्व विषय त्यांच्या कानावर घातला. ना. पंकजाताईंनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले आणि यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक बोलवून विस्तृतपणे चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. ••••

_मोंढा मार्केटमधील पाण्याच्या टाकीवर हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा ठपका

इमेज
गंभीर दखल व कठोर भूमिका: परळीत टाकी बराच वेळ ओव्हरफ्लो होऊन पाण्याची नासाडी; संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई! मोंढा मार्केटमधील पाण्याच्या टाकीवर हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा ठपका ठेवत काढला निलंबन आदेश परळी वैजनाथ : प्रतिनिधी...     परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व न. प. पदाधिकारी पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अतिशय गंभीर असल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच वान प्रकल्पातील अवैध पाणी उपशाच्यामुद्द्यावरून नगराध्यक्षांचे आक्रमक रूपही बघायला मिळाले होते.अशा परिस्थितीत पाण्याची बचत आणि काटेकोर नियोजन करण्याची गरज असताना मोंढा मार्केट येथील पाण्याच्या टाकीवरून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला. अनेक नागरिकांनी याबाबत नगराध्यक्षा, पाणीपुरवठा सभापती व नगरसेवकांकडे तक्रारी केल्या होत्या.याची गंभीर दखल घेत याप्रकरणी कठोर भूमिका घेण्यात आली असून संबंधित एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.       मोंढा मार्केट येथील पाण्याच्या टाकीवर नियुक्त अ...

धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

इमेज
परळीत उभारणार 765 के.व्ही. अति उच्चदाब उपकेंद्र व विद्युत जोडणी प्रकल्प, ऊर्जा विभागाकडून 1345 कोटींची मंजुरी धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ येथे महापारेषण मार्फत ७६५ के.व्ही. अति उच्चदाब उपकेंद्र व विद्युत जोडणी प्रकल्पास राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने १३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  राज्य सरकारने राज्यातील एकूण वीज मागणीचा विचार करता अतिउच्च दाब प्रणाली विकसित करण्यासाठी या प्रकल्पास परळी येथे उभारण्यास माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या विनंतीनुसार मान्यता दिली असून, याबद्दल श्री मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.  या उपकेंद्रामध्ये ७६५ के.व्ही. अतिउच्च दाब उपकेंद्र, १५०० क्षमतेचे ३ ट्रान्सफॉर्मर, यांसह आवश्यक विद्युत जोडणी इत्यादी कामे करण्यात येणार असून, यामुळे विद्युत निर्मिती व पारेषण क्षेत्रात परळीचे वजन वाढणार आहे तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस वाव मिळणार आहे. येत्या काही दिवस...

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
  नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या ३१ दिवसीय मौन अनुष्ठानाची परळीत सांगता;  बेलवाडी येथे धार्मिक कार्यक्रम; महाप्रसादाचे आयोजन परळी : येथील वैद्यनाथ मंदिराजवळील श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) येथे कर्नाटकातील निंबर्गा येथील श्री ष. ब्र. १०८ नीलकंठ शिवाचार्य महाराज गदगेश्वर हिरेमठ यांच्या ३१ दिवसीय २५व्या श्रावणमास मौन अनुष्ठानाची सांगता शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. दि. १३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या अनुष्ठानामुळे बेलवाडी परिसरात महिनाभर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील निंबर्गा येथील नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या मौन अनुष्ठानाचा हा २५वा वर्ष आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता पाद्यपूजा व मौन समाप्ती होईल. त्यानंतर इष्टलिंग पूजा, विविध धार्मिक विधी तसेच शिवाचार्य महाराजांचे आशीर्वचन होणार आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगता सोहळ्यास माजी मंत्री व आमदार बसवराज पाटील, आमदार प्रवीण स्वामी ( उमरगा) , श्री संत गुरुलिंग स्वामी (बेलवाडी) ...
इमेज
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यकार्यकारिणी बैठक व व्याख्यान परळी / प्रतिनिधी        महाअंनिस ची राज्यकार्यकारिणी ची बैठक मानवलोक अंबाजोगाई येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे . या बैठकीसाठी महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यातील १०० ते १५० कार्यकर्ते येणार आहेत . कार्यकारी समिती, प्रत्येक जिल्ह्यातील कार्याध्यक्ष व प्रधान सचिव, समितीच्या २४ विभागाचे कार्यवाह,सहकार्यवाह येत आहेत. मागील ३ महिन्यातील  समितीच्या कामाचा आढावा व पूढील महिन्यातील कामाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा केली जाते .    तसेच या निमित्ताने शनिवारी १२ सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता सांगली येथील लेखक व इतिहास संशोधक प्रा.डॉ. काशिलिंग गावडे यांचे व्याख्यान होणार आहे . हे व्याख्यान शहरातील लोकांसाठी बौद्धिक पर्वणीच असते . या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाअंनिस बीड जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे .      याप्रसंगी महाअंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे, कार्याध्यक्ष संजय बनसोडे , सर्व विभागाचे प्रधान सचिव, राज्य सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत .   ...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय...

इमेज
  कमी पाण्यात ‘करटुले’चा प्रयोग; दीड एकरातून लाखोंच्या उत्पन्नाचा राजमार्ग  धर्मापुरीतील प्रगतिशील शेतकरी कुंडलीक बाबुराव फड यांची नावीन्यपूर्ण शेती; मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय धर्मापुरी प्रतिनिधी : कमी पाणी, वाढता शेतीचा खर्च आणि बदलते हवामान यामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र, या परिस्थितीला संधी मानत धर्मापुरी येथील प्रगतिशील शेतकरी कुंडलीक बाबुराव फड यांनी कमी पाण्यात करटुले पिकाची यशस्वी लागवड करून शेतीतील नावीन्याचा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात केलेल्या या प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या प्रयोगाकडे वेधले गेले आहे. फड यांनी गट क्रमांक २००३ मधील सुमारे दीड एकर क्षेत्रावर गावरान बियाण्यांपासून करटुलेची लागवड केली आहे. साधारण चार महिन्यांच्या या पिकाला लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी फळधारणा सुरू होते. त्यानंतर दर १० ते १५ दिवसांनी तोडणी करता येते. एका हंगामात साधारण दहा तोडण्या होत असल्याने नियमित उत्पन्नाची शक्यता निर्माण होते. ठिबकवर करटुले; पाण्याची बचत क...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

इमेज
  परळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन परळी वैजनाथ : परळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, सन २०२५ च्या खरीप पिकांच्या विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची प्रलंबित रक्कम लाभार्थ्यांना तत्काळ वितरित करावी, यासह तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे पूर्ण करावीत, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी लाटकर साहेब यांना देण्यात आले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरुण मराठवाडा संपर्क नेते अंबादास दानवे उप नेत्या प्रा .सुषमाताई अंधारे बिड जिला संपर्क प्रमुख परशुराम जाधव उप संपर्क प्रमुख बाळासाहेब आंबुरे बिड जिला प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे उप जिला प्रमुख नारायण सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना परळी तालुका प्रमुख  भोजराज पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली उप जिल्हाधिकारी लाटकर साहेबांना निवेदन देण्यात आले....

जनुकीय बदलाची शक्यता...

इमेज
आठ दिवसांच्या शेळीच्या पिलाला पान्हा; दिंद्रुडमध्ये अजब घटना जनुकीय बदलाची शक्यता, घाबरण्याचे कारण नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे अवघ्या आठ दिवसांच्या शेळीच्या पिलाच्या स्तनातून दूधसदृश द्रव येत असल्याची अजब घटना समोर आली आहे. गेल्या सुमारे सात दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने कटारे कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. जनुकीय बदलामुळे अशी घटना घडण्याची शक्यता असून, यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दिंद्रुड येथील सुदाम कटारे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे सुमारे आठ शेळ्या आहेत. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या एका शेळीने तीन पिलांना जन्म दिला. त्यापैकी एका पिलामध्ये जन्मानंतर काही दिवसांनी असामान्य शारीरिक बदल दिसून आला. या पिलाच्या स्तनातून दूधसदृश द्रव बाहेर येत असल्याचे कटारे यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला कुटुंबीयांना हा प्रकार पाहून आश्चर्य वाटले. मात्र, वारंवार द्रव येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास ...

परळीत श्रावण महोत्सव झाला पण परळीकरांना कळलच नाही.,..

इमेज
‘श्रावण महोत्सव’ की सरकारी सोपस्कार?; कार्यक्रम झाला, रसिक मात्र गायब! दर्जेदार कलावंत, उत्तम कार्यक्रम; पण प्रसिद्धीअभावी शासनाचा सांस्कृतिक उपक्रम जनतेपासूनच दूर परळी वैजनाथ : प्रतिनिधी..   महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेला ‘श्रावण महोत्सव’ अपेक्षित रसिकांविना पार पडल्याने शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनासह प्रसिद्धी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भक्तिसंगीताचा सुरेल आविष्कार आणि गुणी कलावंतांचा सहभाग असतानाही कार्यक्रमाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात अपयश आल्याने दर्जेदार कार्यक्रमाचा अपेक्षित परिणाम साधता आला नसल्याची चर्चा शहरात आहे.  ‘श्रावण महोत्सवा’अंतर्गत ‘स्वरविहार’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. राजेश सरकटे यांच्यासह विविध कलावंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र, कार्यक्रमाची व्यापक पूर्वप्रसिद्धी झाल्याचे जाणवले नाही. शहरातील अनेक नागरिक, रसिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाच कार्यक्रमाची माहिती नसल्याची स्थिती होती. कार्यक्रम...

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...

इमेज
खेळतांना आडबाजूला घेऊन गेला, अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; खळबळजनक घटना परळी वैजनाथ:प्रतिनिधी...       तालुक्यातील जिरेवाडी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मारुती मंदिर परिसरात खेळताना अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या आईने तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नव्हती. काही वेळानंतर अतिप्रसंग झालेल्या अवस्थेत रडत रडत ही मुलगी घरी आली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गावातीलच एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         जिरेवाडी येथे ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलगी गावातील मारोती मंदिराच्या परिसरात खेळण्यासाठी गेली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही.कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतरकाही वेळाने अतिप्रसंग झालेल्या अवस्थेत रडत रडत ही मुलगी घरी आली. तिच्यावर घडलेल्या अतिप्रसंगाची कहाणी तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितली. याबाबत मुलीच्या आईने परळी पोलीस ठाण्यात तक्र...
इमेज
परळीत मुलांसाठी १०८ पार्थिव शिवलिंग पूजनाचा गीता परिवाराचा अनोखा उपक्रम उत्साहात  परळी वैजनाथ :  प्रतिनिधी...       प. पू. स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच संजय भैया मालपाणी आणि प्रमिला दीदी माहेश्वरी यांच्या प्रेरणेने गीता परिवार, परळी वैजनाथ यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त नर्मदा बाबा हनुमान मंदिर येथे मुलांसाठी १०८ पार्थिव शिवलिंग पूजनाचा विशेष धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडला. परळी शहरात मुलांसाठी अशा प्रकारचे आयोजन प्रथमच करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.       गीता परिवाराच्या वतीने मुलांसाठी पार्थिव शिवलिंग तयार करून देण्यात आले. कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना मुलांचे ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत स्वागत करून कपाळी टिळा लावण्यात आला. पूजेसाठी टोपी, वस्त्र, माळ तसेच आवश्यक पूजासाहित्य उपलब्ध करून देण्यात आले. काही मुलांकडे पूजेसाठी आवश्यक साहित्य कमी असल्यास त्यांनाही ते साहित्य देण्यात आले.महाराज प्रसाद कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चार व विधीवत मार्गदर्शनाखाली मुलांच्या हस्ते पार्थिव शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. गीता परिवाराच्या...