इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-पंतप्रधानांसोबत पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उज्जैन येथे महाकाल काॅरिडोरचे लोकार्पण



पंतप्रधानांसोबत पंकजाताई मुंडे यांचीही उपस्थिती

आज उज्जैन येथे महाकाल काॅरिडोरचे लोकार्पण;परळीत खा. डाॅ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत लाईव्ह कार्यक्रम पहाणार 


परळी वैजनाथ । दिनांक ११।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उज्जैनच्या  महाकाल मंदिर काॅरिडोरचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधानां समवेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सहप्रभारी पंकजाताई मुंडे हया देखील उपस्थित राहणार आहेत.  दरम्यान, हा कार्यक्रम शहरातील नागरिकांना थेट लाईव्ह पाहण्याची सोय करण्यात आली असून खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

   काशी विश्वनाथ काॅरिडोरच्या धर्तीवर उज्जैन येथे ८५६ कोटी रूपये खर्च करून सुमारे ४७ हेक्टरवर महाकाल मंदिर काॅरिडोर उभारण्यात आला आहे. भगवान शंकराचे अद्भुत, अकल्पनीय आणि अलौकिक विश्वाचे दर्शन यातून होणार असून या काॅरिडोरला  
'महाकाल लोक' असे नाव देण्यात आले आहे. उद्या याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी करणार असून पंकजाताई मुंडे प्रमुख अतिथी असणार आहेत.

*परळीत लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची सोय*
-----------
आज (ता. ११) सायंकाळी ५ ते रात्रौ ८ वा. दरम्यान हा कार्यक्रम परळीतील नागरिकांना लाईव्ह पाहता येणार आहे, त्याकरिता प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर भाजपच्या वतीने मोठा स्क्रीन लावण्यात येणार आहे. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे हया याप्रसंगी उपस्थित असणार आहेत. लोकार्पण निमित्ताने  प्रभू वैद्यनाथास अभिषेक देखील करण्यात येणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी तसेच भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या