MB NEWS- *वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक* *स्व.बाबुराव कराड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन*

 *वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक* 



*स्व.बाबुराव कराड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन*


*गुरूवारी सकाळी 09 वाजता पांगरी येथे होणार अंत्यविधी*


परळी (दि.12) ............. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय, परळी नगर परिषदेचे माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक झाला असून, त्यांचे वडील कै.बाबुराव राजाराम कराड यांचे आज दुपारी 03 च्या दरम्यान वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षे इतके होते.


उद्या सकाळी (दि.13) 09 वाजता कै.बाबुराव कराड यांच्या पार्थिवावर पांगरी (गोपीनाथगड), ता.परळी येथे विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

कै.बाबुराव कराड हे गेल्या काही दिवसांपासून हृदयाच्या आजाराने त्रस्त होते, दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुणे येथील एका नामांकित रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारादरम्यान वृध्दापकाळाने त्यांची आज दुपारी प्राणज्योत मालवली. कै.बाबुराव कराड यांच्या मागे पत्नी, वाल्मिकअण्णा कराड, महादेव कराड हे दोन मुले,मुलगी तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.  

वाल्मिकअण्णा कराड यांच्यासह कराड कुटूंबियांचे पितृछत्र हरवल्याने कराड कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार