इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकाकुल भावना

 भगीरथ बियाणी यांच्या दुःखद निधनाची बातमी अस्वस्थ अन् सुन्न करणारी



पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकाकुल भावना


बीड  । दिनांक ११।

भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या दुःखद निधनाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. बियाणी हे धडाडीचे कार्यकर्ते होते, त्यांचं असं अचानक जाणं मनाला अस्वस्थ आणि सुन्न करणारं आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 

   पंकजाताई मुंडे आज मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत  होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी त्या सकाळी उज्जैनला रवाना झाल्या. इंदौर  विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना बियाणी यांच्या निधनाची बातमी समजली आणि धक्काच बसला. आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, भगीरथ हा माझा जवळचा आणि लाडका कार्यकर्ता होता. माझ्या जीवाच्या कार्यकर्त्यांनं असं कसं केलं. त्यांचं जाणं धक्कादायक आहे, प्रचंड दुःख होतयं, ते शब्दात व्यक्त करता येत नाही. ही घटना मनाला खूप अस्वस्थ आणि सुन्न करणारी आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करते की, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

हे देखील वाचा:🌑 *भगीरथ बियाणी यांचे निधन :आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द - खा.डाॅ. प्रितम मुंडे*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या