इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-सावधान :घरबसल्या कमावण्याची संधीची लिंक पाठवली व 33 हजारांची केली ऑनलाईन फसवणूक

 सावधान :घरबसल्या कमावण्याची संधीची लिंक पाठवली व 33 हजारांची केली ऑनलाईन फसवणूक










परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    वर्क फ्रॉम होम मधून पैसे मिळवण्याचे अमिष दाखवून महिलेला 33 हजार रुपयांचा फटका बसल्याचा प्रकार परळी शहरात समोर आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घरबसल्या कमावण्याची संधीची लिंक पाठवली व 33 हजारांची  ऑनलाईन फसवणूक केली.अशा प्रकारच्या फसव्या लिंक व सोशल मीडियावर येणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
      कुरेशी उमामा शबनम निसार अहमद रा.परळी असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना एका मोबाईलधारकाने एक लिंक पाठवून वर्क फ्रॉम होम मधून पैसे कमावण्याची संधी असल्याचे सांगितले. डिजीटल करन्सीमध्ये आपण काम करत असल्याचे या मोबाईल धारकाने फोन करुन सांगितले. उमामा यांनी विश्वास ठेऊन सांगेल त्याप्रमाणे त्याच्या खात्यावर 33 हजार 584 रुपये भरले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संभाजीनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. यावरुन अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या