MB NEWS-महिलांनी केलं जंगी स्वागत ; मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा

 लोकनेत्याच्या लेकीचं विदर्भात कौतुक !

महिलांनी केलं जंगी स्वागत ; मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा


वर्धा ।दिनांक १४।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं आज विदर्भात जंगी स्वागत झालं. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण केलं, लोकनेत्याच्या आठवणींना यावेळी उपस्थितांनी उजाळा दिला.


    परळी येथील भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख यांच्या मुलाचा विवाह सोहळा आज वर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या विवाहास उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे आज मुंबईहून वर्धा येथे आल्या होत्या. शहरात भाजपच्या वतीनं त्यांचं मोठं स्वागत करण्यात आलं. महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण केलं.

प्रत्येकाने मुंडे साहेबांचा फोटो मोबाईल मध्ये दाखवत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महिलांचा प्रतिसाद  खूप होता, कार्यकर्त्यांनी त्यांचेसोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली  होती.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!